Home क्राइम वॉच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतून साडेआठ लाखांचा गावठी दारूसाठा जप्त

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतून साडेआठ लाखांचा गावठी दारूसाठा जप्त

 

डोंबिवली दि.16 एप्रिल :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिसांनी शिरढोण गावातून तब्बल साडेआठ लाखाचा गावठी दारूचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या हातभट्टी, मादक पदार्थ विक्री, अवैध हत्यारांची विक्री होणार नाही याबाबत निवडणूक आयेागाकडून पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत. शिरढोण गावातील जंगलात नाल्याशेजारी गावठी दारूची हातभट्टी असून विष्णु हरी पाटील नावाचा इसम हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सकाळी छापा टाकून गावठी दारू तयार करण्याची हातभट्टी उध्दवस्त केली. पोलिसांनी या कारवाईत  सुमारे ८ लाख ३३ हजार ९०० रूपयांचे दारू बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचेही उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दादाहरी चौरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बाळासाहेब तांबे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) निसार कुलकर्णी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक संदीप शिंगोटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वलवे, पोलीस नाईक किरपण, पोलीस नाईक काळे, पोलीस नाईक वाघ, पोलीस शिपाई भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*