Home Uncategorised ‘मस्जिद परिचय’च्या माध्यमातून इस्लाम आणि मशिदीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

‘मस्जिद परिचय’च्या माध्यमातून इस्लाम आणि मशिदीबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न

कल्याण दि.10 फेब्रुवारी :
मशीद आणि इस्लाम धर्माबाबतचे असणारे गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जमात ए इस्लामी हिंद आणि कल्याणातील मुस्लिम समाजातर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘मस्जिद परिचय’ असे या उपक्रमाचे नाव असून त्या माध्यमातून इस्लाम धर्म आणि मशिदीतील प्रार्थनांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे कल्याणातील सर्वात जुन्या अशा दुधनाक्यावरील जामा मशिदीत झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मुस्लिमेतर समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सर्व समाजाला एकत्र आणतो, एकत्र घेऊन चालतो तो खरा धर्म असे म्हटले जाते. या तत्वाला समोर ठेवून ‘जमात ए इस्लामी हिंद संस्थेच्या कल्याण विभागाने इस्लाम धर्माची, त्यातील रूढी परंपरांची मुस्लिमेतर धर्मियांना माहिती व्हावी आणि या समाजबाबत असणारी नकारात्मक धारणा बदलावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश. त्यानूसार आज झालेल्या मस्जिद परिचय कार्यक्रमात मशिदीचे महत्व काय? मशिदीत नमाज (प्रार्थना) कशी अदा करतात? ती का करतात? 5 वेळा नमाज करण्यामागील उद्देश काय? दिवसात असणाऱ्या प्रार्थनांपैकी प्रत्येक प्रार्थनेचे महत्व काय? वेगळेपण काय? अशा अनेक मुद्द्यावर जमात ए इस्लामी हिंद, दक्षिण औरंगाबादचे अध्यक्ष प्रा.वाहिद अली खान यांनी प्रकाशझोत टाकला. त्याचबरोबर यावेळी मुस्लिम बांधवांकडून अदा केलेला नमाज उपस्थित इतर नागरिकांना दाखवण्यात आला. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी मशीद आणि इस्लाम धर्माबाबत विचारलेल्या प्रश्नांची प्रा. खान यांनी इतर धर्मातील दाखले देत मनमोकळी उत्तरं दिली.

या कार्यक्रमाला डॉ. गिरीश लटके, कल्याण आयएमए चे सचिव डॉ. प्रशांत पाटील, अनंत हलवाईचे अमृत गवळी यांच्यासह जमात ए इस्लामी हिंद कल्याणचे प्रमूख मिशल चौधरी, मोईन डोण, शरफुद्दीन कर्ते, जामा मशिदीचे इमाम जोहेर डोन आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*