Site icon LNN

केडीएमसीमध्ये शिवसेना – भाजप युतीचा मास्टरस्ट्रोक ; दोन्ही पक्षांचे तब्बल 20 उमेदवार बिनविरोध

कल्याण डोंबिवली दि.2 जानेवारी :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत शिवसेना–भाजप महायुतीने इतिहास घडवणारा मास्टरस्ट्रोक खेळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या यशस्वी व्यूहरचनेमुळे विरोधी पक्षाच्या अनेक दिग्गज उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक आणि मतदानापूर्वीच महायुतीचे तब्बल २० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या इतिहासात अशाप्रकारची विक्रमी कामगिरी यापूर्वी कधीच झाली नव्हती. (Masterstroke by Shiv Sena–BJP Alliance in KDMC; As Many as 20 Candidates Elected Unopposed)

कालच्या दिवशीही दोघांच्या संयुक्त रणनीतीतून महायुतीचे ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे आज दुपारी 1 वाजल्यापासूनच आधी भाजप आणि मग त्यापाठोपाठ शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली. या दोघांचेही मिळून आज आणखी ११ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने केडीएमसी निवडणुकीत नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. केडीएमसीच्या निवडणूक इतिहासात आतापर्यंत इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार कधीही बिनविरोध निवडून आले नव्हते.

महायुतीच्या या बिनविरोध उमेदवारांमध्ये कल्याण पूर्व, डोंबिवली पूर्व आणि डोंबिवली पश्चिमेतील पॅनलचा समावेश आहे. मात्र कल्याण पश्चिम येथून कोणत्याही पॅनलमधून बिनविरोध उमेदवार निवडून आलेला नाही. या घडामोडींमुळे केडीएमसीमध्ये महायुतीची स्थिती अधिक भक्कम झाली असून, उर्वरित प्रभागांतील निवडणूक लढतीसाठीही शिवसेना–भाजप युतीला मोठे मनोबल प्राप्त झाले आहे.

तर इतके दिवस भाजप आणि शिवसेना महायुतीवर सडकुन टिका करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसेसारख्या प्रमुख विरोधी पक्षातील उमेदवारांनी कचखाऊ धोरण स्वीकारत महायुतीसमोर अक्षरशः लोटांगण घातल्याचे दिसून येत आहे.

बिनविरोध निवडून आलेले भाजपचे उमेदवार…

१) रंजना पेणकर – २६ ब
२) आसावरी नवरे – २६ क
३) मंदा पाटील- २७ अ
४) ज्योती पाटील- २४ ब
५) रेखा चौधरी- १८ अ
६) मुकंद तथा विशू पेडणेकर- २६ अ
७) महेश पाटील २७ ड
८) साई शेलार १९ क
९) दिपेश म्हात्रे- २३ अ
१०) जयेश म्हात्रे- २३ ड
११) हर्षदा भोईर- २३ क
१२) डॉ.सुनिता पाटील- १९ ब
१३) पूजा म्हात्रे- १९ अ
१४) रविना माळी- ३० अ

(LNN- LOCAL NEWS NETWORK)

शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार

1 – पॅनल क्र. 24 अ
रमेश म्हात्रे

2 – पॅनल क्र. 28 अ
हर्षल राजेश मोरे
3 – पॅनल क्र. 24 क
वृषाली रणजीत जोशी
4 – पॅनल क्र. 24 ड
विश्वनाथ राणे
5 – पॅनल क्र. 28 ब
ज्योती राजन मराठे
6 – पॅनल क्र. 11 अ
रेश्मा किरण निचळ
(#LNN लोकल NEWS NETWORK)

Exit mobile version