Home ठळक बातम्या ‘ओपन लँड टॅक्स’विरोधात बांधकाम व्यावसायिक उतरले रस्त्यावर

‘ओपन लँड टॅक्स’विरोधात बांधकाम व्यावसायिक उतरले रस्त्यावर


कल्याण दि.12 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या बहुचर्चित ‘ओपन लँड टॅक्स’विरोधात कल्याण डोंबिवलीतील शेकडो बिल्डर आणि संबंधित कर्मचारी वर्ग आज रस्त्यावर उतरला होता. हा जाचक कर तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी एमसीएचआयच्या कल्याण डोंबिवली युनिटने महापालिकेवर मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला.
येथील सहजानंद चौकातून निघालेल्या मोर्चामध्ये बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, इंजिनिअर यांच्यासह कामगार वर्गही सहभागी झाल्याने या मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त झाले होते.
गेल्या 5 वर्षांपासून आम्ही हा जाचक कर रद्द करावा या मागणीसाठी लढा देतोय. मात्र 5 महापालिका आयुक्त आणि 3 महापौर बदलूनही आमचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. हा केवळ बांधकाम व्यावसायिकांचा लढा नसून हा जाचक कर रद्द झाल्यास त्याचा सामान्य जनतेलाही निश्चित फायदा होणार असल्याचे एमसीएचआय उपाध्यक्ष रवी पाटील यांनी एलएनएनला दिली.
तर ओपन ‘ओपन लँड टॅक्स’ कमी झाला तर कर्जत, बदलापूर, टिटवाळा परिसरात घरं घेणाऱ्या ग्राहकांना कमी दरात आम्ही घर देऊ शकू अशी प्रतिक्रिया एमसीएचआय अध्यक्ष मनोज राय यांनी दिली.

दरम्यान 27 गावांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी एमसीएचआयने यावेळी केली. याठिकाणी बहुतांश अनधिकृत बांधकाम सुरू असून त्याच्यामुळे आमच्यासारख्या अधिकृत व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. याला संपूर्णपणे महापालिका प्रशासन जबाबदार असून या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी एमसीएचाय माजी अध्यक्ष प्रफुल शहा यांच्यासह अमित सोनवणे, प्रितेश पटेल आणि अनेक बांधकाम व्यावसायिक सहभागी झाले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*