Home ठळक बातम्या म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारीही ठरली आजच्या सोडतीत विजेती

म्हाडाची ‘ती’ महिला कर्मचारीही ठरली आजच्या सोडतीत विजेती

 

ठाणे दि.14 ऑक्टोबर :
म्हाडाच्या 8 हजारांहून अधिक घरांची आज सोडत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडली. यामध्ये म्हाडा कर्मचारी छाया राजेश राठोड या म्हाडा कर्मचारी गटातून विजेत्या ठरलेल्या.

छाया राजेश राठोड यांच्यावर काही महिन्यांपूर्वी कथित गैरव्हव्हाराचे आरोप झाले होते. मात्र म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत या आरोपात कोणतेही तथ्य न आढळल्याने राठोड यांना क्लिनचिट देण्यात आली होती. छाया राठोड या गेल्या 11 वर्षांपासून सातत्याने म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरत होत्या. आज ठाण्यात झालेल्या सोडतीमध्ये कोड क्रमांक 322 आणि 323 मध्ये म्हाडा कर्मचारी गटातून त्या विजेत्या ठरल्याची माहिती राजेश राठोड यांनी दिली. तसेच छाया राठोड यांच्यावर झालेल्या त्या आरोपानंतर आजचा दिवस आम्हा कुटुंबियांसाठी फारच महत्वाचा असल्याची प्रतिक्रियाही राठोड यांनी दिली.

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (13 ऑक्टोबर) 5 ठिकाणी लसीकरण
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 84 रुग्ण तर 46 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा