Home Uncategorised किती दलित,आदिवासी, मुसलमानांना भारतरत्न दिला? खासदार ओवेसी यांचा भाजप सरकारला सवाल

किती दलित,आदिवासी, मुसलमानांना भारतरत्न दिला? खासदार ओवेसी यांचा भाजप सरकारला सवाल

कल्याण दि.27 जानेवारी :
नुकतेच ज्यांना ज्यांना भारतरत्न पुरस्कार दिले त्यामध्ये किती दलित, आदिवासी आणि मुसलमान आहेत असा परखड सवाल करीत एमआयएमचे खासदार बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकरवर जोरदार हल्ला चढवला. कल्याणच्या एपीएमसी मार्केट परिसरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला लोोकांनी मोठी गर्दी केली होती.

सरदार वल्लभभाई पटेल नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणखी काही वर्षे जिवंत असते तर रोहित वेमुलाचा मृत्यू झाला नसता. ज्या लोकांनी आपल्याला 70 वर्षे रडवलं. त्यांच्याविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय देतील या भ्रमात राहू नका असे आवाहनही ओवेसी यांनी यावेळी केले. एकीकडे 26 जानेवारीला मोहम्मद रफीची देशभक्तीपर गाणी ऐकायची आणि मुंबईत मात्र मोहम्मदला घर घेऊ द्यायचे नाही. 280 जागा मिळवूनही पंतप्रधान रोहित वेमुलाच्या मृत्यू रोखू शकले नाही. तर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे नाव न घेता ओवेसी यांनी त्यांच्यावर टीका केली. पार्लमेंटमध्ये दलित समाजाचे एक मंत्री आहेत मी नाव नाहीं घेणार. मला खूप त्रास झाला की तुम्ही त्यांची चमचेगिरी करीत होते असे सांगत ओवेसी यांनी शिवसेनेचा काय नेमका मामला आहे समजत नाही. एवढे का मोदीला घाबरता तुम्ही? असा सवाल उपस्थित केला.

तर आरएसएस ही देशातील एक आतंकवादी संघटना असून आरएसएस प्रमूख शस्त्रांची पूजा करतात. पोलीस ,लष्कर असताना शस्त्रांची गरज काय? खडा स्ववाल भारिप महासंघाचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला. आरएसएसने सांस्कृतिक राष्ट्रवाद काय असतो तो समजावून सांगावा. कारण यांचा राष्ट्रवाद म्हणजे मनुवाद आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आसपासच्या 70 किलोमीटरचा परिसर हा सरकारसाठी सोन्याची कोंबडी आहे. इथला मुसलमान बदमाश असता तर संपूर्ण काश्मिर जळत असते. गेल्या 70 वर्षांत राजकीय।पक्षांनी कोणाला उमेदवारी दिली? आधी जातशाही आली आणि नंतर घराणेशाही आली. तर विकासाचा आराखडा देऊ शकत नाही म्हणून आरक्षणाची खिरापत सरकार वाटत सुटल्याचा घणाघाती आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी करीत वैचारिक दिवाळखोरीचे हे सरकार उखडून फेकण्याचे उपस्थितांना आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*