Home ठळक बातम्या खवय्यांसाठी पर्वणी ; डोंबिवलीत 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान मिसळ महोत्सवाचे...

खवय्यांसाठी पर्वणी ; डोंबिवलीत 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान मिसळ महोत्सवाचे आयोजन

भाऊ चौधरी फाऊंडेशन आणि शिवसेना – युवासेनेतर्फे आयोजन

डोंबिवली दि. 27 एप्रिल :
सांस्कृतिक उपराजधानी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या डोंबिवलीची खाद्यप्रेमी नगरी अशीही ओळख आहे. चवीने खाणाऱ्या इथल्या खवय्यांसाठी पुन्हा एकदा मिसळ महोत्सवाच्या माध्यमातून खाद्यपर्वणी उपलब्ध होत आहे. भाऊ चौधरी फाऊंडेशन आणि शिवसेना – युवासेनेतर्फे येत्या 29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान हा मिसळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ज्याप्रमाणे वडापाव हा आपल्या महाराष्ट्राचा ब्रँड ॲम्बेसेडर ठरला आहे त्याचप्रमाणे मिसळही आपल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा मानबिंदू समजला जातो. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जशी भाषा बदलते तशी केवळ मिसळच नव्हे तर ही मिसळ बनवण्याची पद्धतही बदलत जाते. नेमका हाच धागा पकडत मिसळ महोत्सवाच्या एकाच छताखाली महाराष्ट्रातील अनेक प्रसिध्द, चमचमीत आणि चविष्ट मिसळ चाखण्याची संधी प्राप्त झाली असल्याची माहिती आयोजक भाऊ चौधरी यांनी दिली.

कुठे आणि कधीपर्यंत असेल हा मिसळ महोत्सव…?

डोंबिवली पूर्वेच्या वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रिडा संकुलात 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान (संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत) हा मिसळ महोत्सव होत आहे. ज्यामध्ये खवय्यांना कोल्हापूर, सांगली, कणकवली, जुन्नर, कल्याण, पारनेर, देहू आदी भागातील चविष्ट मिसळची चाखता येईल. त्यासोबतच डोंबिवलीकरांना यामध्ये प्रथमच येवल्याची पैठणी लकी ड्रॉ द्वारे जिंकण्याची संधी असून विविध हस्तनिर्मित कलावस्तू खरेदी करता येणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा