Home क्राइम वॉच हरवलेले तब्बल 800 मोबाईल एसीपी स्क्वॉडने केले लोकांना परत

हरवलेले तब्बल 800 मोबाईल एसीपी स्क्वॉडने केले लोकांना परत

डोंबिवली दि.9 जानेवारी :
मोबाईल चोरी किंवा हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी बनवण्यात आलेल्या मोबाईल चोरी विरोधी एसीपी स्कॉडने तब्बल 811 मोबाईल शोधून काढत ते संबंधिताना परत केले. मानपाडा पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

वाढत्या मोबाईल चोऱ्या, गुन्ह्यातील मोबाईल वापराचे प्रमाण आणि हरवणाऱ्या मोबाईलच्या वाढत्या घटना लक्षात घेता सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरी विरोधी पथकाची निर्मिती करण्यात आली. त्यानूसार या पथकाने 51 गुन्हे उघडकीस आणले असून विविध गुन्ह्यातील 172 मोबाईल हस्तगत केले आहेत. तर लोकांचे हरवलेले तब्बल 639 महागडे मोबाईलही या पथकाने शोधून काढले आहेत.

त्याजोडीला हरवलेल्या 8 व्यक्ती 1 ऍक्टिव्हा गाडी आणि 1 रिक्षा असा मिळून तब्बल 1 कोटी 6 लाखांचा मुद्देमाल या पथकाने हस्तगत केला. हे हरवलेले मोबाईल आणि वाहनांचा हस्तांतरण सोहळा आयोजित करीत त्याद्वारे संबंधित मालकांना या वस्तू परत करण्यात आल्या.

सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक स्वप्निल केदार, पोलीस हवालदार संजय कोळी, पोलीस नाईक गणेश भोईर, गुणवंत देवकर, कुशाल जाधव आदींच्या पथकाने ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*