Home ठळक बातम्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात आमदार गणपत गायकवाड यांचे उपरोधिक आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याणात आमदार गणपत गायकवाड यांचे उपरोधिक आंदोलन

कल्याण दि.27 जुलै :

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या आशेळे गावातील मुख्य रस्त्याची गेल्या 5 वर्षापासून दुरावस्था असून रस्त्याचे काम मंजूर होऊनही तो केला जातनसल्याविरोधात कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आज अनोखे आंदोलन केलेलं पाहायला मिळाले. आज असलेली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आधी होम-हवन करत आणि त्यानंतर रस्त्यात ठाण मांडून आमदार गणपत गायकवाड यांनी सरकारचा निषेध केला.

या रस्त्याच्या डागडुजीसंदर्भात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र अद्यापही रस्त्याची डागडुजी केली जात नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून नागरिक खड्डेमय रस्त्यातून प्रवास करत आहेत. याच्या निषेधार्थ आमदार गणपत गायकवाड यांनी रस्त्यातच बसून सरकारविरोधात घोषणा देत अंदोलन केले.
यावेळी आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेचा निषेधही नोंदवत शिवसेनेच्या नेत्यांकडून जाणुन बुजून आपली कामे अडवली जात असल्याचा आरोपही केला. या आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मागील लेखअखेर गांधारी पूल वाहतुकीसाठी झाला खुला; पोलिसांनी हटवले बॅरिकेट्स
पुढील लेखम्हारळ, वरप, कांबा येथील पूरग्रस्तांना डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मदतीचा हात

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा