Home ठळक बातम्या नांदीवली परिसरात पाणी साचल्याच्या मुद्द्यावर आमदार राजू पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

नांदीवली परिसरात पाणी साचल्याच्या मुद्द्यावर आमदार राजू पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

 

डोंबिवली दि.10 जून :
मुसळधार पावसामुळे नांदीवली परिसरात पुन्हा कमरेपर्यंत पाणी साचले होते. यासंदर्भात आमदार राजू पाटील यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता थातूर मातूर उत्तरं दिल्याने आमदारांनी त्यांची चांगलीच कान उघाडणी केलेली पाहायला मिळाली.

मुसळधार पावसामुळे डोंबिवली पश्चिमेच्या नांदीवली परिसरात काल पुन्हा एकदा पाणी साचले होते. त्याची पाहणी करण्यासाठी आज आमदार राजू पाटील याठिकाणी आले होते. त्यावेळी महापालिका अधिकऱ्यांनाही बोलावले होते. त्यावेळी आमदारांनी नालेसफाई आणि पाणी साचण्याबाबत प्रश्न विचारले. मात्र अधिकारी वर्गाने त्यावेळी थातूर मातूर उत्तरं देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आमदारांनी नागरिकांसमोरच त्यांची चांगली खरडपट्टी काढत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. तसेच आमदार निधीतून तात्पुरत्या स्वरूपातील कामांसाठी निधी देण्यासह कायमस्वरुपी नाले बांधण्यासाठी तब्बल १ कोटीचा निधी वर्ग करण्याचा मनोदयही व्यक्त केला.

या पाहणी दौऱ्यावेळी आमदार राजु पाटील, मनसे डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मनोज घरत, हर्षद पाटील महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश कोरे, किरण वाघमारे, ड्रेनेज विभागाचे माधगुंडी, लीलाधर नारखेडे, प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पवार आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा