Home Uncategorised कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवरून आमदार रविंद्र चव्हाणांची एकनाथ शिंदेंवर टिका

कल्याण डोंबिवलीतील विकासकामांवरून आमदार रविंद्र चव्हाणांची एकनाथ शिंदेंवर टिका

 

डोंबिवली दि.2 जून :
ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या शहरांनी आपल्याला आणि आपल्या पक्षाला गेली २५ वर्षे एकहाती सत्ता दिली असून इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते. मात्र व्यस्त कार्यभारामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आपले सपशेल दुर्लक्ष होत असल्याची टिका आमदार रविंद्र चव्हाण यांनी पालकमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे. आमदार चव्हाण यांनी आज डोंबिवलीत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. (MLA Ravindra Chavan criticizes Eknath Shinde over development works in Kalyan Dombivali)

तुम्ही गेली 7 वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहात. तुमच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. मात्र गेल्या 2 वर्षांपासून नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी केडीएमसीसंबंधित विषय अद्याप प्रलंबित ठेवल्याचा आरोपही आमदार चव्हाण यांनी यावेळी केला. तर कल्याण आणि डोंबिवलीतील उड्डाणपूल, सूतिकागृह, रिंगरोड, कल्याण-शिळ काँक्रीटीकरण, मेट्रो प्रकल्प अशा विविध विकासकामांची यादी सादर करत आमदार चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलेले पाहायला मिळाले.

आमदार रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित केलेले मुद्दे…

मोठागाव माणकोली पुलासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात 223 कोटी निधी दिला होता. त्या पुलाचे बांधकाम कधी होणार ?

कल्याण शीळ रोडच्या कॉंक्रिटीकरण आणि विस्तारासाठी मंजुरी आणि १ हजार ७७३ कोटी निधीला मंजुरी दिली होती. अजूनही काम पूर्ण का होत नाही ? अजून किती अंत पाहणार ?

राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या केडीएमसीमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाच्या रिंगरोडच्या दुर्गाडी मोठागाव हेदुटणे मार्गाचे बांधकाम कधी होणार ?

ऐरोली काटई भुयारी उन्नत मार्गाचे काम कधी पूर्ण होणार ?

₹   4 हजार 738 कोटी खर्चाच्या मेट्रो १२ म्हणजेच कल्याण तळोजा मेट्रोचे काम कधी होणार?

8 हजार 416 कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी कल्याण काम प्रगत केव्हा होणार?

एमएमआरडीएच्या माध्यमातून 1 हजार 472 कोटी निधी मंजूर झालेले केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षापासून प्रलंबित का ?

सात वर्षे झाली सूतिकागृहाचे बाळंतपण कधी? आयुक्त सूर्यवंशी आणि कायदा विभागाचे अधिकारी सूर्यवंशी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणाचा जाच सूतिकागृहाला किती काळ सहन करावा लागणार?

केडीएमसी क्षेत्रातील दुचाकीस्वारांनी रस्त्यांवरील खड्ड्यात पडून जीव गमावले आहेत. त्यामुळे रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवून अजून किती जीव धोक्यात टाकणार?

अर्धवट अवस्थेतील जोशी हायस्कुल पुलाचे लोकार्पण

ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याला उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी मंजूर कधी करणार?

मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटी खर्चापैकी २५ कोटीचा भार एमएमआरडीएने करण्याबाबत अडचण कोण सोडवणार?

कल्याण तालुक्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या टिटवाळ्यातील मेडिकल कॉलेजकरिता जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार ?

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा