Home ठळक बातम्या डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेचे आंदोलन

डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेचे आंदोलन

मनसेने स्वखर्चाने भरले या रस्त्यावरील खड्डे 

डोंबिवली दि.1 जुलै :
डोंबिवली एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्डयांविरोधात मनसेने अनोखे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा निषेध केला. यावेळी मनसेने स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे भरलेले पाहायला मिळाले.

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी 110 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अद्याप या रस्त्यांच्या कामाला कोणत्याही प्रकारे सुरुवातच झाली नसल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले. तसेच पावसाळा तोंडावर असताना यापूर्वीच रस्त्यांची कामे केली जाणे आवश्यक होते. गेल्या 7 वर्षांपासून खासदार याठिकाणचे प्रतिनिधित्व करत असूनही एवढा विलंब का लागत असल्याचा सवाल जिल्हाध्यक्ष भोईर यांनी उपस्थित केला. त्यामूळे यासंदर्भात मनसेने आज स्वखर्चाने खड्डे भरण्याचे आंदोलन करत सत्ताधारी आणि प्रशासनाचा विरोध केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा