Home ठळक बातम्या कल्याण स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने घडवली अद्दल

कल्याण स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने घडवली अद्दल

कल्याण दि.26 फेब्रुवारी :
कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली. कल्याण शहर मनसेने रात्रीच्या सुमारास या स्कायवॉक परिसराला भेट देत तृतीयपंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर तृतीयपंथीयांकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी कल्याण शहर मनसेला आल्या होत्या. स्कायवॉकवरून जाणाऱ्या लोकांकडून जबरदस्ती पैसे लुबाडणे, पैसे दिले नाहीतर घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करणे आदी प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्याची माहिती मनसे विभाग अध्यक्ष कपिल पवार यांनी एलएनएनला दिली. या तक्रारींची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री थेट कल्याणच्या स्कायवॉकवर धडक देत तृतीयपंथीयांना चांगलीच अद्दल घडवली. मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्कायवॉक पिंजून काढत याठिकाणी असणाऱ्या तृतीयपंथीयांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.

जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर,महिला शहराध्यक्ष शितल विखणकर, विभाग अध्यक्ष कपिल पवार यांचा ह्यांच्यासह शहर सचिव अर्चना चिंदरकर (लाड़), शहर संघटक चेतना रामचंद्रन, उपशहराध्यक्ष्या प्रधन्या कांबळे, सुरेखा महाजन, उपविभाग रोहन अक्केवार, शाखाध्यक्ष सचिन सावंत, संदीप पंडीत, सानीका गावड़े, अमिता खरात, अरुणा गामरे, संतोष गायकवाड़, मयुर सावंत, उदय शिंपी, अक्षय कांबळे, अभिजीत सोनाळकर, शुभम बांगर आणि इतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यामध्य सहभागी झाले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा