Home ठळक बातम्या डोंबिवलीत मनसेने गाजराचा केक कापून भाजपचा केला हटके निषेध

डोंबिवलीत मनसेने गाजराचा केक कापून भाजपचा केला हटके निषेध

Assigned by : Appasahe

 

डोंबिवली दि.28 ऑक्टोबर : मनसेनं डोंबिवलीत आज चक्क गाजराचा केक कापत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. कल्याण-डोंबिवलीकरांना मुख्यमंत्र्यांनी तीन वर्षात केवळ गाजर दिल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीपूर्वी २०१५ साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत विकास परिषद घेतली होती. यात केडीएमसीला विकास आराखड्याच्या माध्यमातून ६५०० कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र आजतागायत यापैकी एकही रुपया केडीएमसीला मिळालेला नसून मुख्यमंत्र्यांनी जनतेची फसवणूक करत गाजर दाखवल्याचा मनसेचा आरोप आहे. याचाच निषेध करण्यासाठी मनसेनं आज डोंबिवलीत चक्क गाजराचा केक कापला. यावेळी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*