Home क्राइम वॉच सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी अधिकारी-कंत्राटदारावर गुन्हे नोंदवा- मनसेची मागणी

सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी अधिकारी-कंत्राटदारावर गुन्हे नोंदवा- मनसेची मागणी

 

डोंबिवली दि. 27 ऑक्टोबर :

मेनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित कंत्राटदार आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेला संपूर्णपणे कंत्राटदार आणि अधिकारीच जबाबदार असल्याचा मनसेचा आरोप आहे.

डोंबिवलीच्या खंबाळपाडा भागात शुक्रवारी संध्याकाळी रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये गुरमरून तीन कंत्राटी सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. मात्र मेनहोलमध्ये रासायनिक सांडपाण्यामुळे निर्माण झालेला घटक विषारी गॅस असल्याचा अंदाज असतानाही सफाई कामगारांना मास्क, सेफ्टी बेल्ट, हार्नेस अशी सुरक्षात्मक साधने पुरवण्यात आली नव्हती, असा मनसेचा आरोप आहे.

यामुळेच या तीन कामगारांच्या मृत्यूला एमआयडीसी अधिकारी आणि कंत्राटदार जबाबदार असल्याचा आरोप मनसेने केला असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र वाडेकर यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*