Home ठळक बातम्या बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांच्या मोबदल्यात घोटाळा झाल्याचा मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांच्या मोबदल्यात घोटाळा झाल्याचा मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट 

एस आय टी स्थापन करून अधिकारी आणि दलालांना उघड करण्याची केली मागणी 

कल्याण ग्रामीण दि.31 ऑक्टोबर : 
केंद्र शासनाच्या महत्वकांशी असलेल्या बुलेट ट्रेन भूसंपादनात मोठा घोटाळा झालाय. रस्त्यावरील ताडपत्रीच्या घरांना शासनाकडून १४ लाखांचा मोबदला दिला जातय,अन सातबाऱ्याच्या स्वतःच्या सातबाऱ्याच्या जागेत घर असलेल्या भूमिपुत्रांना सात लाखांचा मोबदला दिला जात आहे. या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भूमिपुत्र शेतकऱ्यांसह भेट घेत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला आहे.

केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प कल्याण ग्रामीण विधानसभेतून जात आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील बहुतांश भूमीपुत्रांच्या जमिनी बाधित होत आहेत. मात्र शासनाकडून या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची भेट घेत केली होती. या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेतली.

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली त्यावेळी भूधारकांना चांगला मोबदला मिळत असल्याने शेतकरीही शासनाला जमीन द्यायला तयार झाले. मात्र अशा वेळेस एक लॉबी तयार झाली जिच्याकडून सावकार असणाऱ्या किंवा बांधकाम नसणाऱ्या गुरचरण जमिनींवर बांधकामे दाखवण्यात आली आणि अशा प्रकारचा मोठा घोटाळा इथे झाल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी केला. तर ज्याठिकाणी शेतकऱ्यांची स्वतःची जागा आहे, स्वतःच्या चाळी, आरसीसी स्ट्रक्चर आहेत, त्यांना 6 लाखांच्या आसपास मोबदला दिला जातो. आणि शिळफाट्याला बंगाली बाबाची ताडपत्रीची जी घर होती, त्यानं सरकारी जागेवर बांधलेल्या ताडपत्रीच्या घरांना मात्र १४ लाखांचं मोबदला दिला जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा पुनरुच्चार आमदार पाटील यांनी यावेळी केला.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा खरं तर केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो निर्धारित कालावधीत पूर्ण करायचा असल्यास त्यांनी याकडे व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. तर या प्रकल्पाचे महाराष्ट्रातील जे पाठीराखे आहेत त्यांनीही लक्ष देण्याची आवश्यकता आमदार पाटील यांनी व्यक्त करत यातील गैर व्यवहाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून अधिकारी आणि दलालांना उघड करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

तर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांच्या या तक्रारीसंदर्भात तातडीने बैठक घेऊन कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ न देण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही न्यायालयात जायच्या आधी बघू काय दिलासा मिळतो का? अन्यथा आम्ही याविरोधात आंदोलन करण्यासह ज्या व्यासपीठावर न्याय मागायचा आहे तिथेही न्याय मागू, परंतू आमच्या भूमिपुत्रांना रस्त्यावर येऊ देणार नाही. त्यांना योग्य मोबदला घेऊन देणारच अशी प्रतिक्रियाही आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा