Home ठळक बातम्या एप्रिल फुल डब्बा गुल-कधी होणार पत्रीपुल’; कल्याणात मनसेचे आंदोलन

एप्रिल फुल डब्बा गुल-कधी होणार पत्रीपुल’; कल्याणात मनसेचे आंदोलन

 

 

कल्याण दि.4 नोव्हेंबर : 

कल्याणच्या जुन्या पत्रिपुलावर आज मनसेने काळे कपडे घालून ठिय्या आंदोलन केले. गेल्या महिन्यात जुन्या पत्रिपुलाचे तोडण्याचे कामाला सुरवात झाली मात्र अचानक ते काम थांबले. तर दुसऱ्या पुलावर बराच वेळ ट्रॅफिक जाम होऊ लागला याचा फटका कल्याण ,डोंबिवली मधील प्रवाशांना पडला. मात्र यावर कोणतही तोडगा काढला नाही आणि जुना पत्रिपुल सुद्धा पाडला नाही. त्यामुळे मनसेने वाहतूक कोंडी, नियोजन शून्य कारोभार विरोधात आंदोलन केले आणि जो पर्यंत आयुक्त येत नाही घटनास्थळी तो पर्यंत ठिय्या आंदोलन करत राहणार असे सांगितले. आंदोलन वेळी एप्रिल फुल डब्बा गुल , कधी होणार पत्रिपुल’ असा सवाल कम घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे महापालिका ,रेल्वे आणि एमएमआरडीए हाय हाय घोषणा दिल्या. यावेळी मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून काळे कपडे घातले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*