Home ठळक बातम्या डोंबिवलीमध्ये मनसेचे डॅमेज कंट्रोल सुरू; कार्यकर्ता मेळाव्याद्वारे मनसेचे शक्तिप्रदर्शन

डोंबिवलीमध्ये मनसेचे डॅमेज कंट्रोल सुरू; कार्यकर्ता मेळाव्याद्वारे मनसेचे शक्तिप्रदर्शन

डोंबिवली दि.8 फेब्रुवारी :
डोंबिवलीतील दोघा दिग्गज पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकल्यांनातर मनसेमध्ये हालचालींना वेग आला असून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली आहे. डोंबिवलीत काल झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले. रविवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्वेतील आदित्य मंगल कार्यालयात हा मेळावा संपन्न झाला.
गेल्या आठवड्यात डोंबिवली मनसे शहराध्यक्ष राजेश कदम यांनी शिवसेनेत आणि गटनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मनसेमध्ये खळबळ माजली. या घडामोडींची दखल थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. तर आमदार राजू पाटील यांनीही तातडीने सूत्रे हालवत राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी मनोज घरत यांच्याकडे डोंबिवली शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.
आपल्याकडे इमान असून तो आपण कोणासाठी विकणार नाही. पक्ष सोडून गेलेल्या लोकांनी स्वतःला विकले आहे. तसेच ज्या व्यक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेली 8 वर्षे महापालिकेत गटनेता, विरोधीपक्ष नेता ही पदं दिली, तरीही त्यांची पोटं भरली नाहीत. अशा व्यक्ती आपल्याला सोडून गेल्या ते आपल्यासाठी चांगली गोष्ट असल्याची टिका यावेळी मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी मेळाव्यामध्ये केली. यावेळी कल्याण ग्रामीण मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान यावेळी वाशी टोलनाका येथे व्हीडीओ बनवणाऱ्या अक्षय मेस्त्री यांनी शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या प्रमूख उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा