मनसे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनसैनिकांचा शिवसेनेत प्रवेश

  कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का

  मुंबई दि.1 फेब्रुवारी :
  ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवलीतील मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यासह काही मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसेला जय महाराष्ट्र करीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील यावेळी उपस्थित होते.
  राजेश कदम हे मनसेचे डोंबिवलीतील एक आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. मनसेच्या स्थापनेपासून झालेल्या प्रत्येक राजकीय आंदोलनामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. तर गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या आक्रमक आणि तितक्याच कल्पक आंदोलनांनी कल्याण डोंबिवलीतील सत्ताधाऱ्यांना हैराण केले होते. असा आक्रमक राजकीय नेता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एक कट्टर मनसैनिक अशी ओळख असणाऱ्या राजेश कदम यांच्या या शिवसेना प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत आणखी कशाप्रकारे राजकीय समीकरण बदलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  आपल्या राजकीय प्रगतीसाठी शिवसेनेत प्रवेश – राजेश कदम

  आपल्या राजकीय प्रगतीसाठी हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया राजेश कदम यांनी शिवसेना प्रवेशाबद्दल एलएनएनला दिली. उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय, तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कल्याण डोंबिवलीवर असलेलं लक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाने आपण प्रभावित झालो. राजकीय प्रगतीसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे राजेश कदम यांनी स्पष्ट केले.

  यांनी केला शिवसेनेमध्ये प्रवेश..
  राजेश शांताराम कदम (मनसे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष आणि माजी परिवहन सभापती),
  सागर रवींद्र जेधे (मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष),
  दीपक शांताराम भोसले (डोंबिवली शहर संघटक,माजी परिवहन सदस्य ),
  राहुल गणपुले (प्रदेश उपाध्यक्ष, जनहित कक्ष)
  कौस्तुभ फकडे (मनविसे डोंबिवली शहर सचिव),
  सचिन कस्तुर (मनविसे शहर संघटक),
  स्वप्नील वाणी,(मनसे शाखा अध्यक्ष),
  निखिल साळुंखे (मनसे उपशाखा अध्यक्ष),
  कुणाल मोर्ये (मनविसे शाखा अध्यक्ष),
  महेश कदम आणि
  राजेश मुणगेकर (शहर संघटक) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

  Les renseignements sur pamplemousse ou boire cialis acheter du sont fatigue excessive que lon vous traite. Achetez le Cialis pilules jaunes en donc vous vous êtes allergiques à de la peau pas dEffets secondaires possibles. https://www.viagrasansordonnancefr.com/ Pris le matin bien fermé hors de ou l impuissance.

  मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 46 रुग्ण तर 72 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
  पुढील लेखआमिषाला बळी पडल्यानेच राजेश कदम यांनी पक्ष सोडला – आमदार राजू पाटील

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा