Home ठळक बातम्या मनसे वाहतूक सेनेतर्फे चिपळूणमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

मनसे वाहतूक सेनेतर्फे चिपळूणमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत

कल्याण दि.12 ऑगस्ट :
महापुराने हानी झालेल्या चिपळूण शहरातील नागरिकांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वाहतूक सेनेतर्फेही चिपळूणमधील विविध भागांत मदतीचे वाटप करण्यात आले. मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक आणि मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
चिपळूणमधील चिलेवाडी, खेर्डी, जे.के.कॉलनी, सती गाव, कळंबस्ते, खालची वाडी आदी ठिकाणच्या नागरिकांना ही मदत करण्यात आली. या परिसरातील तब्बल 400 ते 450 कुटुंबांना यावेळी मनसेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच यापूढेही काहीही अडचण असल्यास मनसे आपल्या पाठीशी खंबीर उभी राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या उपक्रमात मोठा हातभार लागला.

मागील लेखगुडन्यूज : हॉटेल-रेस्टॉरंटचीही वेळ वाढवली; कल्याणात पेढे वाटून साजरा केला आनंद
पुढील लेखसार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाचे शुल्क आकारू नये – रवी पाटील यांची मागणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा