Home ठळक बातम्या कल्याणमध्ये इमारतीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग

कल्याणमध्ये इमारतीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग

कल्याण 24 ऑक्टोबर :

इमारतीच्या टेरेसवरील मोबाईल टॉवरला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी कल्याणजवळच्या शहाडमध्ये घडली. विमल पार्क या ७ मजली इमारतीच्या टेरेसवर हा टॉवर बसवण्यात आला होता. या टॉवरला आग लागल्यानंतर इमारतीवरून धुराचे मोठे लोट निघू लागले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोवर हा टॉवर पूर्णपणे जळून खाक झाला होता. ही आग कशी लागली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून यामुळे इमारतीत राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षा मात्र वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*