Home क्राइम वॉच कल्याण डोंबिवलीत 20 जणांना मोक्का तर 21 जण तडीपार ; 1680 रिक्षाचालकांवरही...

कल्याण डोंबिवलीत 20 जणांना मोक्का तर 21 जण तडीपार ; 1680 रिक्षाचालकांवरही नियमभंगाची कारवाई

कल्याण दि.17 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीतील टोळ्या आणि अट्टल गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी जबरदस्त मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अवघ्या 21 दिवसांत तब्बल 20 गुन्हेगारांना मोक्का लावण्यात आला तर 21 जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. याजोडीला कायदा मोडणाऱ्या 1600 हुन अधिक रिक्षाचालकांवरही कारवाईचा बडगा उगरण्यात आल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील विविध मान्यवर आणि सामान्य नागरिकांच्या समस्या- तक्रारी अपर पोलीस आयुक्त दिघावकर यांच्याकडे आल्या होत्या. त्याची दखल घेत कल्याण डोंबिवलीतील पोलिसांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. त्यानुसार कल्याण डोंबिवलीतील 4 टोळ्यांच्या 20 जणांवर मोक्कानव्ये कारवाई केली. तर 21 जणांना तडीपार करण्यात आले असून आणखी 36 जणांवरील ही कारवाई प्रस्तावित असल्याचे दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

तर रिक्षाचालकांच्या वाढत्या मुजोरीला आळा घालण्यासाठी कायदेभंग करणाऱ्या 1हजार 680 हून अधिक रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच रिक्षाचालकांना शिस्त लागावी यासाठी रिक्षा संघटनांच्या 150 पदाधिकाऱ्यांना नोटीसाही पाठवण्यात आल्या आहेत. तर कारवाई करूनही रिक्षा चालकांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्यांचे बॅच, परमिट, लायसन्स रद्द करण्यासह वेळप्रसंगी रिक्षाजप्तीची कारवाईही करण्याचा इशाराही प्रताप दिघावकर यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेला सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय कांबळे (कल्याण), रविंद्र वाडेकर (डोंबिवली) हे देखील उपस्थित होते.

1 COMMENT

  1. कल्याणमध्ये एजंतच्या टोळ्या आहेत.ते खोटे बोलणे,अफवा पसरवून त्रास देणे,
    बदनामी करणे असे उद्योग करतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*