Home ठळक बातम्या कल्याणच्या चिमुरड्यांनी 3 हजार 200 फूट मलंगगड केला सर; सह्याद्री रॉक एडव्हेंचरचे...

कल्याणच्या चिमुरड्यांनी 3 हजार 200 फूट मलंगगड केला सर; सह्याद्री रॉक एडव्हेंचरचे सहकार्य

 

कल्याण दि.7 डिसेंबर :
सह्याद्री रॉक एडव्हेंचर गिर्यारोहक समूहाच्या सहकार्याने तिघा चिमुकल्यांनी कल्याणनजीक असणारा 3 हजार 200 फूट उंच मलंगगड सर केला. ओम ढाकणे 4 वर्षे, परिणीती लिंगे 7 वर्षे आणि अवंती गायकवाड 7 वर्षे अशी या मुलांची नावे आहे.

महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या गड- किल्ल्यांबाबत जनजागृती व्हावी, त्यांची माहिती मिळण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवल्याचे भूषण पवार यांनी सांगितले. मलंगगड हा माथेरानच्या डोंगररांगात असून त्याची समुद्र सपाटीपासून 3 हजार 200 फूट उंची आहे. या गडावर एक जीर्ण वाडा दिसतो. तसेच त्याठिकाणी पाण्याच्या टाक्या असून इतिहासकाळात या गडाचा वापर कल्याण, भिवंडी, बदलापूर अशा जवळच्या शहरांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता. कल्याणच्या दक्षिण दिशेपासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर हा गड आहे. तर पनवेलच्या वावंजे गावापासून हा गड अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. कंरजा, उरण, बोरघाट, भिमाशंकर, माळशेज असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता.

मलंगगड सर करताना साहस आणि मनाची शक्ती असणे गरजेचे आहे. दोन कातळकडे केवळ एका लोखंडी पाईपला बांधून त्यावर चालत मलंगगडाच्या शिखरावर जाता येते. हे धैर्य कल्याणच्या तिघा लहान मुलांनी दाखविले आहे. सह्याद्री रॉक अडव्हेंचर गिर्यारोहक समूहाचे पवन घुगे, अक्षय जमदरे, दर्शन देशमुख आणि रणजीत भोसले यांनी या मुलांना प्रोत्साहन देत गड सर करण्यास सहकार्य केले.

https://youtu.be/9UFRPlazaZs

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा