अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स काढण्याची पालिकेची कारवाई सुरुच

  कल्याण दि.29 जानेवारी :
  महापलिका क्षेत्रातील अनाधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स काढण्याची कारवाई सुरुच आहे. ‘ब’ प्रभागक्षेत्र परिसरात प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते आणि त्यांच्या कर्मचारी पथकाने योगीधाम, मुरबाड रोड आणि संतोषी माता रोड परिसरातील रस्‍त्‍यांच्‍या बाजूला असलेले 42 छोटे-मोठे अनाधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्स काढण्यात आले. तर कल्याण पूर्वेच्या ‘जे’ प्रभागात प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांच्या कर्मचारी पथकाने नेतिवली ते टाटा पाँवर नाका, पुना लिंकरोड ते काटेमानिवली रोड तसेच तिसगाव रोडवरील 90 छोटे-मोठे अनाधिकृत बॅनर्स काढून टाकण्यात आले. तसेच डोबिवली येथील ‘ग’ प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी स्नेहा कर्पे यांच्या पथकाने दत्तनगर, शिवमंदिरमानपाडा रोड,‍ गांधीनगर, नेरुरकर रोड या भागातील 84 अनाधिकृत बॅनर्स काढण्यात आले.

  ‘ब’ प्रभागक्षेत्र परिसरात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त पल्लवी भागवत, मालमत्ता व्यवस्थापक संजय जाधव तसेच ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या पथकाने 6 मोठी होर्डिग्स आणि 1 कमान जेसीबी , हायड्राचा वापर करुन पाडण्यात आली.

  तर कल्याण पूर्वेच्या ‘आय’ प्रभागात प्रभागक्षेत्र अधिकारी संदिप रोकडे यांच्या कर्मचारी पथकाने चेतना स्कूल ते व्दारली गाव (श्री मलंग रोड) टाटा पॉवर ते रिजन्सी सर्कल (कल्याण शिळ रोड) या ठिकाणी 56अनाधिकृत मोठे बॅनर्स-पोस्टर्स काढून टाकण्याची कारवाई केली.

  अनधिकृत होर्डिंग्स मुळे शहरातील विद्रुपीकरणात भर पडत असल्याने, शहराचे सौंदर्यीकरण अबाधित राखण्यासाठी पालिका महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहर सौंदर्यीकरणासाठी धडक कारवाईचे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना दिले असून ही कारवाई यापुढे सुरू राहणार आहे.

  Achetez Viagra Generique à pris pas cher dans notre pharmacie. Prenez une décision ferme et définitive. D’une manière ou d’une autre, je n’ai pas pensé aux effets secondaires. cialispascherfr24 Maintenant, j’ai lu les commentaires et j’y ai pensé.

  १ कॉमेंट

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा