Home कोरोना कल्याण डोंबिवलीत उद्या (7 जुलै) महापालिकेचे लसीकरण बंद

कल्याण डोंबिवलीत उद्या (7 जुलै) महापालिकेचे लसीकरण बंद

 

कल्याण -डोंबिवली दि.6 जुलै :
कल्याण डोंबिवलीतील लसीकरणामागे लागेलेलं शुक्लकाष्ठ काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यामुळे उद्या 7 जुलै रोजी पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीतील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

गेल्या 2 आठवड्यापासून कल्याण डोंबिवलीतील लसीकरणाला मोठ्या प्रमाणात खीळ बसली आहे. आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे आवश्यक असताना शासनाच्या असल्या बेजबाबदार वागण्याचा आगामी काळात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.

शासनाकडून लसी प्राप्त न झाल्यामुळे हे लसीकरण आतापर्यंत वारंवार विस्कळीत होत आहे. मात्र या लसी का दिल्या जात नाहीत? आणि दिल्या गेल्याच तर एवढ्या तुटपुंज्या प्रमाणात का दिल्या जातात की खासगी रुग्णालयाच्या फायद्यासाठी असे प्रकार सुरू आहेत का? यासारखे विविध संतप्त सवाल नागरिकांकडून विचारले जात आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा