Home कोरोना डोंबिवलीमधील नाहर रुग्णालय बनतय सर्जिकल हब’; अवघ्या 2 महिन्यात ३८ यशस्वी सर्जरी

डोंबिवलीमधील नाहर रुग्णालय बनतय सर्जिकल हब’; अवघ्या 2 महिन्यात ३८ यशस्वी सर्जरी

डोंबिवली दि.21 डिसेंबर: प्रतिनिधी 
कल्याण शीळ रोडवरील नाहर हॉस्पिटल हे सर्जिकल हब  झाले आहे. तब्बल दोन महिन्यात ३८ सर्जरी नाहर रुग्णालयात यशस्वी झाल्या आहेत. रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा मानस आणि कमीत कमी खर्चात यशस्वी उपचार करणारे रुग्णालय म्हणून ते आघाडीवर आले आहे.
 डोंबिवलीमधील या नाहर हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण हे उपचारासाठी येत असतात. या रुग्णांवर यशस्वी उपचार करून रुग्णालयाने एकही सर्जरी ही अयशस्वी केली नाही. रुग्णालयात प्रामुख्याने टि.के.आर., ब्रेन सर्जरी जर्नल सर्जरी, प्रसूती, स्टोन आदी प्रकरच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. त्यातही विशेष बाब म्हणजे एकही सर्जरी आता पर्यंत रुग्णालयाकडून अयशस्वी झालेली नाही. रुग्णालयात रुग्णांसाठी  एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टीसारख्या सुविधा देखील उपलब्ध झाल्या असून गरजूंना याचा फायदा होईल असा विश्वास रुग्णालयाचे संचालक दिनेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.
वैद्यकीय सेवा देत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवत कमीत कमी खर्चात चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न नहार हॉस्पिटल हे नेहमीच करत आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातील रुग्णांना वेळेत उपचार कमीत कमी खर्चात हे नाहर रुग्णालय करत आहे. परिणामी इतक्या कमी कालावधीत नाहर रुग्णालयाने लोकांंच्या मनात एक विश्वास आणि मानाचे स्थान आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा