Home ठळक बातम्या श्रीमलंगगड परिसरातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते महायुतीत सहभागी

श्रीमलंगगड परिसरातील राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते महायुतीत सहभागी

 

कल्याण दि.17 एप्रिल :
श्री मलंगगड परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला. श्रीमलंग गड परिसरात महायुतीची बाजू यामुळे आणखीन भक्कम झाली असून गेल्या पाच वर्षांतील कामाच्या जोरावर निवडून येऊ, असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

श्री मलंगगड परिसरातील विविध गावांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. स्वतः डॉ. शिंदे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार किसन कथोरे, गणपत गायकवाड, भाजप अंबरनाथ तालुकाध्यक्ष राजेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, सरपंच चैनू जाधव यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुर्दल गावातील माजी सरपंच वाघाराम पाटील, विजय पाटील, मंगेश पाटील, उसाटणे गावचे सरपंच आशाताई पाटील, दर्शन पाटील आदी पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह महायुतीत सहभागी झाले.  नेवाळी पाडा, चिंचवली, शेलारपाडा, चिरड, पाली, न्हारेण, उसाटणे, बुर्दुल, कुंभार्ली, करवले, पोसरी, मांगरूळ, काकडवाल, खरड, आबे, ढोके, कुशिवली, श्रीमलंग वाडी अशा श्री मलंगगड परिसरातील सर्व गावांमध्ये या प्रचारफेरी नेण्यात आली.

सीरवी समाज, सिंधी समाजाचा पाठिंबा
डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी सीरवी समाज विकास मंडळ यांच्यातर्फे सीरवी समाजाचा भव्य मेळावा श्री आईमाता मंदिर, सोनारपाडा येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. सीरवी समाज डॉ. शिंदे आणि महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, सीरवी समाजाचे अध्यक्ष चुनिलाल पायल, ताराचंद चौधरी, भोलाराम चौधरी, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे तसेच सीरवी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिंधी समाजाचाही पाठिंबा
कल्याण येथे सिंधी काउंसिलतर्फे नववर्षानिमित्त चेटिचंद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून सिंधी बांधवांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सिंधी बांधव नेहमीच शिवसेना व भाजपच्या बाजूने उभे राहिले आहेत. सिंधी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी युतीने नेहमीच पुढाकार घेतला असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कामगिरीबाबत सिंधी बांधवांनी समाधान व्यक्त करून पाठिंबा जाहीर केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*