Home ठळक बातम्या कल्याणात नवरात्रौत्सवाच्या कमानी कोसळल्या; कारचे नुकसान मात्र सुदैवाने कोणाला दुखापत नाही

कल्याणात नवरात्रौत्सवाच्या कमानी कोसळल्या; कारचे नुकसान मात्र सुदैवाने कोणाला दुखापत नाही

कल्याण दि.१ ऑक्टोबर :
आज दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे कल्याण पश्चिमेला आग्रा रोडवर लावण्यात आलेल्या नवरात्रौत्सवाच्या कमानी कोसळल्या. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी एका कारचे नुकसान झाले. त्याशिवाय या प्रकारामुळे कल्याणातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.

आज दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास आचानक ढगांच्या गडगडाटात पावसाच्या जोरदार सरी सोसाट्याच्या वाऱ्यासह आल्या. कल्याण पश्चिमेच्या आग्रा रोडवर नवरात्री निमित्त मोठ मोठ्या होर्डींगच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने दुर्गाडी चौकात उभारण्यात आलेली एक कमान पूर्णच्या पूर्ण रस्त्यावर कोसळली. ज्यामध्ये त्याखाली आलेल्या एका कारचे नुकसान झाले.

तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातही उभारण्यात आलेली कमान रस्त्यावर कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावरून कोणतेही वाहन जात नव्हते. मात्र या दोन्ही प्रकारामुळे आग्रा रोडसह त्याच्या अंतर्गत रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळाली. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची अक्षरशः तारांबळ उडाली होती.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच कल्याण पूर्वेतही अशाच प्रकारे उभारण्यात आलेली कमान कोसलल्याचा प्रकार घडला होता. त्यापाठोपाठ आता कल्याण पश्चिमेतही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने अशा धोकादायक कमनींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा