Home ठळक बातम्या LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; ठाण्यातून आनंद परांजपे तर कल्याणातून बाबाजी...

LoksabhaElection2019 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; ठाण्यातून आनंद परांजपे तर कल्याणातून बाबाजी पाटील

मुंबई दि.14 मार्च :

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित यादी उद्या आणि परवा घोषित करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील।यांनी सांगितले.

या यादीमध्ये महाराष्ट्रातील 10 आणि लक्षद्वीपमधील 1  अशा 11 नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर हातकणंगले लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडल्याचेही पाटील यांनी सांगितले.

पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे निश्चित असलेल्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत मावळमधून पार्थ पवारांच्या नावाची घोषणा होईल, अशी शक्यता होती, मात्र त्यांच्या उमेदवारीवरुन सस्पेन्स अजूनही कायम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*