Home ठळक बातम्या ..तर आमदार मेधा कुलकर्णींनीही जन्मभर भाकऱ्या थापल्या असत्या – चित्रा वाघ 

..तर आमदार मेधा कुलकर्णींनीही जन्मभर भाकऱ्या थापल्या असत्या – चित्रा वाघ 

 

डोंबिवली दि.27 ऑक्टोबर :

शाहू, फुले, आंबेडकर नसते, तर आज आमदार मेधा कुलकर्णींनाही जन्मभर भाकऱ्या थापत बसावं लागलं असतं, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. कल्याण शीळ रोड नजीक असलेल्या पाटीदार हॉल येथे  राष्ट्रवादी पक्षातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन करताना ही टिका केली.

महिला लोकप्रतीनिधीकडे संपूर्ण महिला आशावादी दृष्टीने पाहतात. त्यामुळे  प्रासिद्धीकरता विधाने करण्यापेक्षा जबाबदारीने वागले पाहिजे. आमदार मेधा कुलकर्णी यांनी जे एका विशिष्ट समाजाविषयी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. हा देश शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारा असून त्यांच्यामुळे देशात समानता आहे. हे नसते तर आज कदाचित मेधा कुलकर्णीही जन्मभर घरी भाकऱ्या थापत बसल्या असत्या. त्यामुळे त्यांचं विधान निषेधार्ह असल्याची टीका राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. तर स्मृती इराणींवरही त्यांनी बोचरी टीका केली. स्मृती इराणींवर गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केल्या जातायत. गुन्हा दाखल करून जर स्मृती इराणींना अक्कल येणार असेल, तर जरूर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी केली. डोंबिवलीत झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. मेळाव्यात बोलताना अच्छे दिन आएंगे, क्यूकी मोदीजी घर जाएंगे, अशी घोषणा राष्ट्रवादीकडून देण्यात आली. महिलांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी  राष्ट्रवादीचे स्थानिक नेते वंडार पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, माजी जिल्हाध्यक्षा माया कटारिया, विद्या वेखंडे  व इतर महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*