Home ठळक बातम्या 27 गावातील विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

27 गावातील विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

कल्याण दि.8 जानेवारी :
27 गावांची नगरपालिका करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आज कल्याण-शिळ मार्गावर आंदोलन केले. तसेच या मार्गावर काही काळ ठिय्या मांडत हा मार्ग रोखून धरण्याचाही प्रयत्न केला.

27 गावांची नगरपालिका करण्याचे,  बंद असणारे रजिस्ट्रेशन सुरू करणे, 6हजार 500 कोटी रुपये देण्याचे आश्वासन भाजप-सेना कधी पूर्ण करणार असा संतप्त सवाल करीत राष्ट्रवादी आज स्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. यावेळी आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. सुरुवातीला रस्त्याच्या एका बाजूला असणाऱ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अचानक कल्याण – शिळ मार्गावरील टाटा पॉवर चौकात येत रस्त्याच्या मधोमध ठिय्या मांडत दोन्हीकडील वाहतूक रोखून धरली. त्यामूळे पत्रीपुलामुळे आधीच वाहतूक कोंडीची झळ सोसावी लागणाऱ्या लोकांना या आंदोलनाचाही फटका बसला.

यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*