Home ठळक बातम्या बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत कल्याणात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत कल्याणात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा

कल्याण दि.13 फेब्रुवारी :
सत्तेत आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्माण करू असे आश्वासन देऊन प्रत्यक्षात मात्र केंद्र सरकारने युवकांची फसवणूक केल्याचे सांगत त्याविरोधात कल्याणात राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला. ‘गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, भाजप हाय हाय’ अशा घोषणाबाजीही यावेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली.

दरवर्षी 2 कोटी नविन रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारने नोटबंदी केल्यानंतर सव्वा कोटी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शिक्षण असूनही हाताला काम उपलब्ध नसल्याने तरुणवर्ग हताश होऊन गुन्हेगारीकडे वळला असल्याचे सांगत या रोषाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा आयोजित केल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिली.

बैल बाजार येथून सुरू झालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोहम्मद अली चौक, दिपक हॉटेलमार्गे तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सोपवले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*