Home ठळक बातम्या कल्याण लोकसभेसाठी स्थानिक भूमीपुत्राबाबत गांभिर्याने विचार करू – शरद पवार

कल्याण लोकसभेसाठी स्थानिक भूमीपुत्राबाबत गांभिर्याने विचार करू – शरद पवार

कल्याण दि.13 मार्च :
होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याबाबत स्थानिक भूमिपुत्राचा गांभिर्याने विचार केला जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना दिले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज कल्याण मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रथमच संवाद साधला. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना मागरदर्शन करताना त्यांनी नरेंद्र मोदी, भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात स्थानिक किंवा भूमिपुत्र असणाऱ्या आगरी कोळी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. ती विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र असणाऱ्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे केली. त्यावर ही मागणी रास्त असून या मागणीबाबत पक्ष गांभिर्याने विचार करेल. मात्र यासाठी इच्छुक उमेदवाराने देखील निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली पाहिजे अशी सूचना करण्यासही पवार यावेळी विसरले नाहीत.

*।।एलएनएन न्यूज लोकसभा निवडणूक अपडेट।।*कल्याण दि.13 मार्च :राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी- कार्यकर्त्यांशी सुरू असलेल्या संवाद कार्यक्रमाचे *लाईव्ह टेलिकास्ट* …*#LoksabhaElection2019**#LNN**#LocalNewsNetwork*

Posted by LNN on Wednesday, March 13, 2019

दरम्यान आपल्या अर्धा तासाच्या भाषणात पवार यांनी राफेल, समृद्धी महामार्ग, शेतकरी आत्महत्या, पुलवामा दहशतवादी हल्ला, एअर स्ट्राईकचा राजकीय फायदा यासारख्या महत्वपूर्ण विषयावर भाष्य करताना मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले. जवानांच्या शौर्याचे भाजपकडून होणारे राजकारण अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे 56 इंचाची छाती आहे असं सांगतात मग 40 जवान कसे काय मारले गेले ? यांच्याकडून देशाचे काय संरक्षण होणार असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर देशात आणि राज्यात सेना-भाजपची सत्ता असल्याने भ्रष्टाचार संपविण्यासाठी येत्या लोकसभेपासून परिवर्तन सुरू करा, चित्र बदलेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*