Home ठळक बातम्या इंधन आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात कल्याणात राष्ट्रवादीचे आंदोलन

इंधन आणि घरगुती गॅसच्या दरवाढीविरोधात कल्याणात राष्ट्रवादीचे आंदोलन

 

कल्याण दि.18 मे :
पेट्रोल- डिझेलसह स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात झालेल्या दरवाढीविरोधात आज कल्याण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून केंद्र सरकार नागरिकांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. केंद्र सरकारने तातडीने ही भाववाढ कमी करून लोकांना दिलासा देण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली.

आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करत असून त्यानंतरही केंद्र सरकारने आमचे म्हणणे ऐकले नाही तर रस्त्यावर उतरून जन आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत 210 झाडं जमीनदोस्त; 13 घरांसह 8 गाड्यांचे नुकसान
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 225 रुग्ण तर 528 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा