Home ठळक बातम्या सध्याची आपली शिक्षण व्यवस्था अपडेट करण्याची गरज – आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक चेतन...

सध्याची आपली शिक्षण व्यवस्था अपडेट करण्याची गरज – आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक चेतन भगत

कल्याणात केम्ब्रिया इंटरनॅशनल कोलेजतर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिर

कल्याण दि. 3 डिसेंबर :
इंग्रजांनी त्यावेळी त्यांच्या फायद्यासाठी बनवलेली शिक्षण व्यवस्था आजही आपण वापरत असलो तरी ही व्यवस्था आता काळानुरूप अपडेट करण्याची गरज आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक चेतन भगत (indian author Chetan Bhagat) यांनी व्यक्त केली आहे. कल्याणात केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजतर्फे के.सी. गांधी शाळेच्या सभागृहात आयजित करिअर गाईडन्स कार्यक्रमात ते बोलत होते.

…या गोष्टींचा विचार करून करिअर निवडण्याचा सल्ला 

आताच्या काळात मुलांनी आणि पालकांनी करिअरसाठी पारंपरिक पद्धतीने विचार करण्यापेक्षा जगामध्ये काय सुरू आहे याचा गांभिर्याने विचार केला पाहिजे. आमच्या वयामध्ये जेवढे पर्याय उपलब्ध नव्हते त्यापेक्षा कित्येक पटीने नवनविन क्षेत्रांची दालने आज खुली झाली आहेत. तर तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे तर करिअरची व्याख्या पूर्णपणे बदलून गेली असून जग कुठे चालले आहे आणि मी कुठे आहे या गोष्टींचा विचार करून करिअर निवडण्याचा सल्ला भगत यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

…हीच तर आयुष्याची खरी गंमत

तर आपल्या आयुष्यात अनिश्चितता, असुरक्षितता आणि रिस्क असणे आवश्यक आहे. हेच खरं आयुष्य असून सुरक्षित आयुष्याचा कंफर्ट झोन सोडून आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बाळगा. कोणाच्याही आयुष्यात निश्चित आणि सुरक्षित असे काहीच नाहीये आणि हीच तर आयुष्याची खरी गंमत असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

या दृष्टीकोनातूनच यशस्वी लोकं काम करतात..

मात्र आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला आणि कामाला कोणताही पर्याय नाहीये. आता आपल्याला जी गोष्ट दुःख देतेय नंतर त्याच गोष्टीतून आपल्याला सुख आणि आनंद मिळणार आहे या दृष्टीकोनातूनच यशस्वी लोकं काम करत असतात. तर आपणही एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असल्याचे सांगत चेतन भगत यांनी उमेदीच्या काळात त्यांना कराव्या लागलेल्या संघर्षाचा जीवनपट त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.

तर मार्गदर्शन कार्यक्रमानंतर पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांनी चेतन भगत यांना सध्याची शिक्षण पद्धती, जागतिक बदल, विद्यार्थी आणि पालकांचा दृष्टीकोन आदींबाबत प्रश्न विचारले. ज्याची भगत यांनी अत्यंत समर्पक अशी उत्तरे दिली.

यावेळी पोटे ग्रुपच्या संचालक मीनल पोटे, केंब्रिया इंटरनॅशनल शाळेच्या प्रिन्सिपल हिना फाळके, एनआयई टाइम्सचे झेवियर डिसोझा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंब्रिया इंटरनॅशनल कॉलेजच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा