Home कोरोना कल्याण डोंबिवलीतील हौसिंग सोसायटी आणि एपीएमसीसाठी नवे निर्बंध लागू

कल्याण डोंबिवलीतील हौसिंग सोसायटी आणि एपीएमसीसाठी नवे निर्बंध लागू

 

नियमांचे उल्लंघन झाल्यास सोसायटीला होणार आर्थिक दंड

कल्याण- डोंबिवली दि.8 जानेवारी :
वेगाने वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नवे निर्बंध लागू केले आहेत. या नियमाचे उल्लघन करणाऱ्या सोसायट्याना पहिल्यांदा 5 हजार आणि दुसऱ्यांदा 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

कल्याण एपीएमसी मार्केटसाठी हे नियम…
कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ ग्राहकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून घाऊक व्यापारी आणि त्यांच्या कर्मचार्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेले असल्यासच त्यांना प्रवेश देता येणार आहे. तर बाजार समिती प्रशासनाने समितीच्या आवारात येणाऱ्या वाहनाची संख्येवर नियंत्रण न आणल्यास दुसऱ्या लाटेप्रमाणे 50 टक्केच वाहनांना आणि व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे निर्बंध लावण्याचा इशारा केडीएमसी आयुक्तांनी दिला आहे. तर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असून मॉल आणि मार्केटलाही नियमांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हौसिंग सोसायटीसाठी हे आहेत नवे नियम…

  • ज्या सोसायटीमध्ये 25 टक्केपेक्षा जास्त कोवीड रुग्ण असल्यास सोसायटीतील प्रत्येक सदस्याची अँटीजन किंवा आरटीपीसीआर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
  • कोवीड पॉझिटिव्ह सदस्य इतर सदस्यांच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांनी घ्यायची आहे.
  • या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायटीला पहिल्यांदा 5 हजार, दुसऱ्यांदा 10 हजार आणि तिसऱ्या वेळेपासून प्रत्येक वेळी 15 हजारांचा दंड आकारण्यात येणार.
  • घरगुती काम करणाऱ्या महिला, सुरक्षारक्षक तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण झालेले असेल तरच त्यांना (पॉझिटिव्ह रुग्ण असणाऱ्या सदनिका, मजला, इमारत सोडून) इतरत्र प्रवेश दिला जाणार आहे.

 

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 20 रुग्ण तर 32 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 1 हजार 248 रुग्ण तर 45 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा