Home ठळक बातम्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाचे शुल्क आकारू नये – रवी पाटील यांची मागणी

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाचे शुल्क आकारू नये – रवी पाटील यांची मागणी

(प्रातिनिधिक फोटो)
कल्याण- डोंबिवली दि.12 ऑगस्ट :
गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून यंदाच्या गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाचे शुल्क आकारू नये अशी मागणी शिवसेनेचे नेते रवी पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र पाठवले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.
गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाने सर्वांचेच आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामूळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही साधेपणानेच गणेशोत्सव साजरा होणार आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची सद्यस्थिती पाहता त्यांच्याकडून मंडप शुल्क आकाराणे उचित ठरणार नाही. त्यामुळे यावर्षी कल्याण डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप शुल्क माफ करण्याची मागणी रवी पाटील यांनी केडीएमसी प्रशासनाकडे केली आहे.

मागील लेखमनसे वाहतूक सेनेतर्फे चिपळूणमधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत
पुढील लेख…तर कल्याण डोंबिवलीकरांना दिल्लीप्रमाणे सुविधा देऊ – आम आदमी पक्ष

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा