Home ठळक बातम्या देखभाल दुरुस्ती कामांसाठी ठाकुर्ली स्टेशन आणि आसपासच्या परिसरात उद्या ७ तास वीज...

देखभाल दुरुस्ती कामांसाठी ठाकुर्ली स्टेशन आणि आसपासच्या परिसरात उद्या ७ तास वीज नाही – महावितरणची माहिती

 

ठाकुर्ली दि.१८ एप्रिल :
वीज वाहिन्यांच्या देखभालीसह इतर कामांसाठी महावितरणतर्फे ठाकुर्ली स्टेशन आणि आसपासच्या परिसरात ७ तास वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

उद्या मंगळवारी 19 एप्रिल रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाकुर्ली फिडरअंतर्गत पेंडसे नगर गल्ली नंबर 1 ते 4, सारस्वत कॉलनी, पंचायत बावडी, चोळेगाव, 90 फूट रस्ता, ठाकुर्ली स्टेशन परिसर आणि लगतच्या परिसरात महावितरणकडून हा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

या शटडाऊन काळात वीजवाहिनीच्या देखभालीचे, झाडे छाटणीची आणि पावसाळा पूर्व देखभालीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या सकाळी १० ते ५ या वेळेमध्ये संबंधित परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

मागील लेखपाणी प्रश्नावरून मनसे भाजप आक्रमक; आमदारांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
पुढील लेखकोवीड काळातील उल्लेखनीय कामगिरी: केडीएमसीला राष्ट्रीय पातळीवरील कोवीड इनोव्हेशन पुरस्कार प्रदान

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा