Home Uncategorised लोकलच्या दरवाजांमधील खांबांना ग्रीप बसवण्याची डोंबिवलीकर प्रवाशाची मागणी

लोकलच्या दरवाजांमधील खांबांना ग्रीप बसवण्याची डोंबिवलीकर प्रवाशाची मागणी

डोंबिवली दि.4 ऑक्टोबर :
मध्य रेल्वेच्या ताफ्यात असणाऱ्या लोकलच्या दरवाजामधील लोखंडी खांबांना ग्रीप (पकड) बसवण्याची मागणी डोंबिवलीकर रहिवासी आणि मनसैनिक भाग्येश इनामदार यांनी केली आहे. लोकलमधील खांबांना नसलेल्या ग्रीपमुळे गर्दीच्या वेळी प्रवासी पडून अपघात होऊ शकतात ही बाब त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याची राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेत मनसेच्या रेल्वे कामगार सेनेला यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यास सांगितले. त्यानुसार मनसे रेल्वे कामगार सेनेचे सरचिटणीस जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवत लवकरात लवकर लोकलच्या दरवाजातील लोखंडी खांबाला ग्रीप बसवण्याची मागणी केली आहे.
सर्वाधिक गर्दीचे स्टेशन अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली स्थानकातून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा दरवाजातून पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर डोंबवलीकर प्रवासी भाग्येश इनामदार यांनी हा महत्वाचा मुद्दा निदर्शनास आणला असून रेल्वे प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*