मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नवरात्रौत्सव कार्यक्रमाला भेट
कल्याण दि. ३० सप्टेंबर :
अध्यक्ष निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र त्यांच्याकडे सध्या निर्माण झालेली ही परिस्थिती पाहता काँग्रेसवर आता कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाहीये अशी मिश्किल टीका केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कल्याणात केली. कल्याण पश्चिमेतील मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नवरात्रौत्सव कार्यक्रमाला भेट दिली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी ही मिश्किल टीका केली. (No one is in control of Congress anymore – Union Minister Kapil Patil’s harsh criticism)
अध्यक्षपद निवडणे हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र भाजप अध्यक्ष निवडताना कधीही कोणत्याही प्रकारचा वाद होत नाही असे. सांगत काँग्रेसमध्ये अशी परंपरा होती की पूर्वी गांधी घराणे हे सांगेल ते होणार. परंतु आता अशी परिस्थिती राहिलेली नाही, ज्याला अध्यक्ष करायचे होते त्यांनी अध्यक्षपद फॉर्म भरण्याची तारीख ,भूमिकाही जाहीर केली आणि मुख्यमंत्रीपद सोडायला लागू नये म्हणून वेगळी चालही केली. त्यावरून काँग्रेसवर आता कोणाचाच कंट्रोल राहिलेला नसल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पती? यांनी सांगितले. तर दररोज वेगवेगळी नावे आपल्याला बघायला मिळत आहेत. इकडे भारत जोडो आंदोलन सुरू आहे आणि तिकडे काँग्रेस तुटायला लागली आहे. भारत जोडायचा की काँग्रेस जोडायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकल्याचेही पाटील यांनी सांगितले.
तसेच भारत जोडो अभियान ते राबवत आहेत. मात्र भारताला कोणी तोडले आहे? असा सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत अखंड आहे. यापूर्वी पाचशे वर्षांपूर्वी जो भारत होता तो अखंड भारत करण्याचे काम आपण करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काँग्रेसने भारताचे विभाजन केले असून भारत जोडो करण्याआधी त्यांनी पाकिस्तानला भारताला जोडले पाहिजे होते. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आता काँग्रेसची काय परिस्थिती झालेली आहे हे जनतेला माहिती आहे. मोदींना आव्हान देण्यासाठी लढवत असलेल्या शक्कल आता त्यांच्यावरच उलटू लागल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक वरुण पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, दया गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान त्यापूर्वी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील देवीचे दर्शन घेतले. तसेच देवीची आरतीही केली.