Site icon LNN

आता विरोधक म्हणणार मला जाऊ द्याना घरी, आता वाजले की 12″- शिवसेना उमेदवार सचिन पोटे यांची फिल्मी स्टाईल प्रतिक्रिया

पॅनलमधील चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार

कल्याण दि.30 डिसेंबर :
कल्याण पूर्वेच्या पॅनल क्रमांक 12 मधून शिवसेनेतर्फे दिग्गज उमेदवार सचिन पोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सचिन पोटे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या हटके शैलीत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी सांगितले की आपला प्रभाग क्रमांक आहे 12, त्यामुळे समोरचे विरोधक म्हणतील मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 अशा शब्दांत पोटे यांनी विरोधकांना टोला लगावला. (“Now the Opposition Will Say ‘Let Me Go Home, It’s 12 O’Clock’” – Shiv Sena Candidate Sachin Pote’s Filmy-Style Reaction)

सचिन पोटे यांनी कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 12 (कोळसेवाडी, गणेशवाडी, आनंदवाडी, लक्ष्मीबाग) येथून मोठे शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत आपला अर्ज दाखल केला. आमचा पॅनल हा अतिशय भक्कम असून चारही उमेदवार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे नागरिकांचा कोणताही गोंधळ उडणार नाही आणि शिवसेनेचे चारही उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तर पूर्वाश्रमीच्या पक्षाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की आधीच्या पक्षापेक्षा किती तरी पटीने अधिक लोकांकडून आपला प्रतिसाद मिळाला आहे. त्या पक्षात आपल्याला लोकांकडे जावे लागायचे मात्र शिवसेनेत स्वतःहून आपल्याला भेटायला येत आहेत. इतकेच नाही तर आपल्या प्रभागात कोकणी मतदार मोठ्या संख्येने असून त्यांच्या रक्तात शिवसेना होती आणि आता आमचा उमेदवार आमच्या घरी आल्याची भावना निर्माण झाल्याचेही पोटे यांनी सांगितले.

Exit mobile version