Home ठळक बातम्या कल्याणमध्ये चायनीजच्या दुकानात झालेल्या स्फोटात अग्निशमन जवानाचा मृत्यू

कल्याणमध्ये चायनीजच्या दुकानात झालेल्या स्फोटात अग्निशमन जवानाचा मृत्यू

कल्याण दि. 29 नोव्हेंबर :

कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरात असलेल्या एका चायनीज दुकानात मध्यरात्री सिलेंडरचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी आलेल्या अग्निशामन दलाच्या जवानाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक जण जागीच गंभीर जखमी झाला आहे.

दुकानाला आग लागल्याची माहिती मिळाल्याने कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले होते. त्यावेळी आंबवले आणि पालवे हे दुकानासमोर उभे राहून आग विझवण्याची तयारी करत असतानाच अचानक प्रचंड मोठा कानठळ्या बसवणारा असा स्फोट झाला. त्यात दुकानाच्या अगदी समोरच उभे असल्याने हे दोघेही जण त्यामध्ये गंभीर जखमी झाले. तर दुर्दैवाने आंबवले यांचा या घटनेत जागीच मृत्यू झाल्याचे समजत आहे. मध्यरात्री 1.10 मिनिटांनी हा मोठा आवाज झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. स्फोटानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या आणि पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. यावेळी अग्निशमन दलाचे जवान जगन आंबवले यांचा जागीच मृत्यू झाला तर पालवे हे गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत

आहे.

 

 

याच महिन्याच्या सुरुवातीला कल्याण पूर्वेत बचावकार्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशमन दलाच्या 2 जवानांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता ही दुर्घटना घडल्याने कल्याण डोंबिवली अग्निशमन दलावर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेचा आणि सुरक्षा उपकरणांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*