Home कोरोना उद्या 10 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोवीशिल्डच्या केवळ 2 ऱ्या डोसचे...

उद्या 10 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोवीशिल्डच्या केवळ 2 ऱ्या डोसचे होणार लसीकरण – केडीएमसीची माहिती

 

कल्याण-डोंबिवली दि.9 मे :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रात उद्या सोमवारी 10 मे रोजी 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोविशील्डचे केवळ 2 ऱ्या डोसचे लसीकरण केले जाणार आहे.

*कल्याण पूर्वच्या नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळा लसीकरण केंद्र* आणि डोंबिवली पूर्वेतील *वै.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल लसीकरण केंद्र* या 2 केंद्रांवर सकाळी 10 ते लस संपेपर्यंत लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

शासनाकडून लसीचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर इतर लसीकरण केंद्रांवर लसीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेसाठी लसीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे.

तर 18 ते 44 वर्षे या वयोगटासाठी पूर्वीप्रमाणे *कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी, लाल चौकी* येथे ऑनलाइन स्लॉट बुकिंगनुसार लसीकरण होणार आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 505 रुग्ण तर 830 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखम्युकरमायकोसिसवर तातडीने उपाय योजनेसाठी राज्यात टास्क फोर्सची गरज – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा