Home Uncategorised उद्या 12 मे रोजी कल्याण डोंबिवलीत होणार केवळ 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

उद्या 12 मे रोजी कल्याण डोंबिवलीत होणार केवळ 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

 

*18 ते 44 वयोगटाचे लसीकरण अनिश्चित काळासाठी स्थगित*

*उद्या 17 लसीकरण केंद्रांवर मिळणार कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचे डोस*

कल्याण-डोंबिवली दि.11 मे :
उद्या 12 मे रोजी कल्याण डोंबिवलीमध्ये केवळ 45 वर्षांवरील नागरिकांचे आणि हेल्थ केअर वर्कर्स फ्रन्टलाइन वर्कर्सचेच लसीकरण केले जाणार आहे. 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण शासनाकडून मिळालेल्या सूचनांनुसार अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. उद्या कल्याण आणि डोंबिवलीमध्ये एकूण 17 केंद्रांवर लसीकरण होणार असून कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचे डोस दिले जाणार असल्याचे केडीएमसी प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तर उद्या या 17 लसीकरण केंद्रांपैकी

1) *आर्ट गॅलरी* , *लाल चौकी* *कल्याण पश्चिम-* कोविशिल्ड केवळ 2रा डोस (45 वर्षावरील)

2). *वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल, कोविड लसीकरण केंद्र डोंबिवली पूर्व* – कोवॅक्सिन 2रा डोस (45 वर्षावरील)

3). *प्रबोधनकार ठाकरे शाळा, लसीकरण केंद्र, नेतीवली दवाखान्याच्या बाजूला, कल्याण (पूर्व*) -कोवॅक्सिन -2 रा डोस (45 वर्षावरील)

.4) *जोशी हायस्कूल छेडा रोड सारस्वत कॉलनी डोंबिवली (पूर्व)* शाळा – कोविशिल्ड- 2रा डोस (45 वर्षावरील)

याव्यतिरिक्त खाली दर्शविलेल्या *उर्वरित 13 लसीकरण केंद्रांवर* 30 टक्के नागरिकांना कोविशील्डचा 1ला आणि उर्वरित 70 टक्के नागरिकांना 2रा डोस दिला जाणार असल्याचेही केडीएमसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा