Home ठळक बातम्या अरेरे ; झाडांच्या छाटणीत बगळ्यांच्या 20 पिल्लांनी गमावला जीव

अरेरे ; झाडांच्या छाटणीत बगळ्यांच्या 20 पिल्लांनी गमावला जीव

 

कल्याण दि.12 जुलै :
पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेली झाडांची छाटणी बगळ्यांच्या 20 पिल्लांच्या जीवावर उठलेली पाहायला मिळाली. कल्याण पश्चिमेतील अनुपम नगर परिसरात हा प्रकार घडला असून पक्षी आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या वॉर रेस्क्यूने तो उघड केला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर अनुपम नगर येथील एका गृहनिर्माण संकुलाने केडीएमसीकडे झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यानूसार केडीएमसीने परवानगी दिल्यानंतर रविवारी या फांद्यांची छाटणी करण्यात आली. मात्र या झाडाच्या फांद्यांवर अनेक बगळ्यांचे घरटी होती. पावसाळा हा इतर पक्ष्यांप्रमाणे बगळ्यांचाही प्रजनन काळ असतो. त्यामूळे या ठिकाणी असलेल्या काही घरट्यांमध्ये बगळ्यांची अंडी तर काही ठिकाणी छोटीशी पिल्लं होती.
मात्र या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्याने ही घरटी खाली कोसळली. आणि बगळ्यांच्या 20 पिल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक पिल्लं खाली पडून जखमी झाल्याची माहिती वॉर रेस्क्यू फाउंडेशनची सदस्य फाल्गुनी दलाल हिने दिली. तर वॉर संस्थेने 11जखमी पिलांना आपल्या ताब्यात घेत त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांना नंतर वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान या घटनेमुळे पक्षीप्रेमींनी हळहळ व्यक्त करत पक्ष्यांच्या प्रजननकाळापूर्वी झाडाच्या फांद्या छाटण्याची मागणी केली.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत उद्या (13जुलै) महापालिकेचे लसीकरण बंद राहणार
पुढील लेखकल्याण पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपूलाची निर्मिती – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा