Site icon LNN

उद्या कल्याणात होणार “ऑपरेशन अभ्यास” मॉकड्रिल; नागरिकांनी घाबरू नये, प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन

 

कल्याण दि.6 मे : –

केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी उद्या ७ मे रोजी कल्याणात “ऑपरेशन अभ्यास” या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याणच्या रामबाग येथील मॅक्सी ग्राउंडवर दुपारी 4 वाजता हे मॉकड्रिल करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांनी केले आहे. (“Operation Abhyas” mock drill to be held in Kalyan tomorrow; Citizens urged not to panic, to cooperate with administration)

या मॉकड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी 4 वाजता नागरी संरक्षण दलाचे सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला जाईल. नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मॉक ड्रिल ही केवळ पूर्वतयारीचा भाग असून कोणतीही खरी आपत्ती उद्भवलेली नाही, हे लक्षात घ्यावे, असे आवाहन नागरी संरक्षण दलाचे उप नियंत्रक विजय जाधव व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version