Site icon LNN

युवा नेतृत्वाला संधी : भाजपच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 मंडल अध्यक्षांची नियुक्ती

डोंबिवली दि.21 एप्रिल :
भाजपाच्या कल्याण जिल्ह्यांतर्गत नव्या 20 जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मंडल अध्यक्ष पदासाठी पक्षातील युवाफळीला प्राधन्य देण्यात आले असून यामुळे संघटना आणखी वाढण्यासाठी मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपाने राज्यभरात नवीन मंडल अध्यक्षाची रविवारी निवड केली. राज्यभरात १ हजार १९६ जणांची मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याणमध्ये पूर्वी 9 मंडल संख्या होती. त्याची संख्या वाढून आता वीस करण्यात आली आहेत. त्यात डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा या पाच विधानसभांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघानुसार अशा झाल्या नियुक्त्या…

डोंबिवली पूर्वमधून मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिममधून पवन पाटील आणि प्रिया जोशी, कल्याण ग्रामीणमधून मंदार टावरे, कर्ण जाधव, धनाजी पाटील, सुनिल म्हसकर, आशिष चौधरी, कल्याण पश्चिममध्ये अमित धाक्रस, स्वप्नील काठे, रितेश फडके, शक्तीवान भोईर, नवनाथ पाटील, कल्याण पूर्वमध्ये मितेश म्हात्रे, विजय उपाध्याय, समीर भांडारी, संतोष शेलार आणि अंबरनाथ विधानसभा मतदार संघात पूर्वेला विश्वजीत गुलाबराव कंरजुले, पश्चिमेला प्रजेश तेलंगे आणि लक्ष्मण पंत याची निवड करण्यात आली आहे.

माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी उपमहापौर राहूल दामले, अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांच्या उपस्थितीत या सर्व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी समीर चिटणीस, मुकुंद पेडणेकर, प्रकाश पवार, रेखा चौधरी यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

एखादा छोट्यातील छोटा कार्यकर्ते मंडल अध्यक्षपदांपर्यत येतो. त्यातूनच नेतृत्व तयार होते, हे पक्षाचे धोरण आहे. मंडल अध्यक्ष होणे हा बहुमान आहे. शंभर बूथसाठी एक अध्यक्ष ही संकल्पना भाजपाने राबविली असून हे सर्व मंडल अध्यक्ष पक्षाचा मोठया प्रमाणावर विस्तार करतील असे विश्वास भाजपाचे माजी महापौर राहूल दामले यांनी व्यक्त केला.

तर भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकत्याला संधी दिली जाते. पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शंभर बूथाला एक अध्यक्ष दिला, अशा पध्दतीने रचना केली आहे. भाजपाचे काम म्हणजे एक प्रकारे राष्ट्राचे काम आहे. हे काम करणे स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. भाजपा हा एक परिवार आहे. त्यामुळे मंडल अध्यक्षपदी वीस जणांची निवड झाली असून त्यांचा आम्ही सर्वजण आनंद साजरा करत असल्याची प्रतिक्रिया भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी दिली.

Exit mobile version