Home ठळक बातम्या डोंबिवलीत रविवारी कैवल्यवारी कार्यक्रमाचे आयोजन ; दिग्गज गायकांचा सहभाग

डोंबिवलीत रविवारी कैवल्यवारी कार्यक्रमाचे आयोजन ; दिग्गज गायकांचा सहभाग

डोंबिवली दि.२९ एप्रिल :

यंदाचा आषाढीवारी सोहळा १० जून रोजी सुरु होतोय. त्याच पार्श्वभूमीवर रविवार ३० एप्रिल रोजी डोंबिवलीत आषाढवारी सोहळ्यावर आधारित ‘कैवल्यवारी’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पं. आनंद भाटे, सावनी शेंडे, कार्तिकी गायकवाड, अवधूत गांधी, विलास कुलकर्णी असे दिग्गज गायक आपली गायन सेवा सादर करणार आहेत. आषाढीवारी सोहळ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांवर आधारित काही गाणी वर्षा हुंजे यांनी लिहिली आहेत, तीही यात सादर होणार आहेत. याशिवाय यातील काही गाण्यांवर नृत्याविष्कारही सादर केले जाणार आहेत.

आषाढीवारी सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रात ‘कैवल्यवारी’ या कार्यक्रमाचे ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे वायर्ड एक्सप्रेशन आणि श्रिया क्रिएशन या संस्थेने सांगितले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा