Home कोरोना केम्ब्रिआ इंटरनॅशनल स्कुल आणि दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे 200 हुन अधिक जणांचे सशुल्क...

केम्ब्रिआ इंटरनॅशनल स्कुल आणि दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे 200 हुन अधिक जणांचे सशुल्क लसीकरण

 

कल्याण दि.12 जुलै :
सध्या लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने महापालिकेची लसीकरण मोहीम काहीशी मंदावल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणातील केंब्रिआ इंटरनॅशनल स्कुल, दत्तकृपा एज्युकेशन ट्रस्टतर्फे ममता हॉस्पिटलच्या साहाय्याने खासगी सशुल्क लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये तब्बल 200 हुन अधिक नागरिकांनी रीतसर शुल्क भरून कोवीडची लस घेतली.

शासनाकडून कोवीड लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवलीत महापालिकेतर्फे राबविण्यात येणारे लसीकरण विस्कळीत झाले आहे. महापालिकेतर्फे केल्या जाणाऱ्या लसीकरण केंद्रांवर नागरिकांना संपूर्ण मोफतपणे कोवीड लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र शासनाकडेच लससाठा नसल्याने त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवलीतील लसीकरणावर झाला आहे. तर ज्यांना आर्थिकदृष्ट्या परवडते असे नागरिक खासगी केंद्रांवर सशुल्कपणे लस घेण्यासाठी तयार आहेत.

या पार्श्वभूमीवर एक सामाजिक जबाबदारी म्हणून ही सशुल्क लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ज्या नागरिकांना खासगीत सशुल्क लस घेणं परवडते त्यांनी खासगी संस्थांमध्ये लसीकरण घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आर्थिकदृष्ट्या परवडत नसणाऱ्या अधिकाधिक सामान्य व्यक्तींना शासनाची मोफत लस मिळू शकेल या प्रमूख उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी दिली. तर भविष्यात लोकांनी इच्छा दर्शवल्यास परत हे सशुल्क लसीकरण आयोजित करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी केम्ब्रिआ शाळेच्या मीनल पोटे, हिना मॅडम, लता मॅडम, वर्षा, सुश्मिता, अमोल, मकरंद, भूषण, अवनी, संपदा, धारा आणि गोकुळ आदींनी विशेष मेहनत घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा