Site icon LNN

“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले डोंबिवलीतील उद्यान – बहिणाबाई स्मृतिदिनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद”

डोंबिवली दि.3 डिसेंबर :
सुनील नगर येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात आज डिसेंबर २०२५ रोजी बहिणाबाई नथुजी चौधरी यांच्या ७५व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. उद्यानात नियमित व्यायामासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सरोजिनीताई पाटील यांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. (“Park Resonates with Bahinabai’s Poems and Slogans – Citizens Gather in Large Numbers on Her Memorial Day”)

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीचे सदस्य कृष्णा मारुती सोमार्डे यांनी केले. या वेळी उपस्थितांनी—“कवयित्री बहिणाबाई चौधरी अमर रहें!”,“बहिणाबाईंची लेखणी – महाराष्ट्राची शान!”,“ग्रामीण संस्कृतीचा अभिमान – कवयित्री बहिणाबाई महान!” या घोषणांनी संपूर्ण उद्यान परिसर दुमदुमून गेला.

व्यायाम समितीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी हा स्मृतिदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. उद्यानात दररोज परिसरातील शेकडो नागरिक व्यायाम, चालणे व खेळण्यासाठी येतात. याच नागरिकांनी “कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती” हा व्हॉट्सअप समूह तयार केला असून बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन आणि काही सण लोकवर्गणीतून साजरे केले जातात.

स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी हास्य कवयित्री – डोंबिवलीकर रहिवासी लताताई पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील काही संस्मरणीय प्रसंग रसग्रहणीय पद्धतीने कथन केले तसेच त्यांच्या अनेक लोकप्रिय कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमात व्यायाम समितीतील महिला वर्गाच्या वतीने लताताई पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उद्यानातील स्वच्छता उपक्रमांतर्गत प्लास्टिकचा कचरा दररोज गोळा करणाऱ्या केशव करकेरा यांचा कोटीयन (दिव्यांग बांधव) यांच्या शुभहस्ते जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. उद्यानातील सर्वात ज्येष्ठ उपस्थित सरोजिनीताई पाटील यांचाही समितीच्या वतीने गौरव करण्यात आला.

अभिवादन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक व माननीय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातील प्रकाश माने यांनी उत्कृष्टरीत्या केले.

कार्यक्रमाला प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे, शरदचंद्र जोशी, हेमंत बारस्कर, सार्थक चव्हाण, सौ. प्रतिक्षा माने, सौ. यशोदा करकेरा, केशव करकेरा, सुरेश भुवड, श्रीकांत काळे, शशिकला महानूर, आनंदा नेने, टी. आर. कुंभार, किशोर वाणी, डी. बी. चिरमडे, अल्फेंसा सिग्युरा, सत्यविजय साईल, हेमंत म्हापणकर, चिंतामण भडसावळे, बाबू वारके, संदीप देवकर, रघुनाथ राणे, फुलचंद माळी, संदीप शेट्टी, संगम भुजबळ, प्रमोद शेट्ये, दीपक पाटील, प्रसाद सावंत, भगवान सातपुते, निवृत्ती पाडवेकर, रेखा गुप्ता, शार्दूल जोशी, गिरीश कुलकर्णी, अक्षय शहा, ममता तिवारी, जितू ठक्कर, अर्चना शिरोडकर, वंदना झाडे, माधुरी कोरडे, श्रीकृष्ण वाणी, शैलेंद्र कमलाकर, सुनीती पुचेरकर, नंदा शाळीग्राम, मेघा ठोंबरे, गीता निवळकर, स्नेहा भोसले, मंदा ठाकूर, अनंत पाटील, परशुराम म्हात्रे, घनश्याम मालवी तसेच समितीचे १०० हून अधिक महिला आणि पुरुष सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version